पुणे : आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड (आयआरबी) ह्या भारतातील आघाडीच्या व सर्वांत मोठ्या एकात्मिक बहुराष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनीने, तेलंगण राज्यात कार्यक्षेत्र विस्तारत, 158 किलोमीटर (1,264 लेन किलोमीटर) अंतराचा हैदराबाद आउटर रिंग रोड (ओआरआर) प्रकल्प प्राप्त केला आहे. टोल-ऑपरेट-ट्रान्स्फर (टोल घ्या-चालवा-हस्तांतर करा) अर्थात टीओटी नमुन्याखाली राबवल्या जाणाऱ्या ह्या प्रकल्पात 30 वर्षांचा महसुलाशी निगडित सवलत कालखंड (कन्सेशन पीरियड) आहे आणि ह्यासाठी कंपनीने 7,380 कोटी रुपयांचे अपफ्रंट पेमेंट करावयाचे आहे.
· ह्या प्रकल्पात 158 किलोमीटर (1,264 लेन किलोमीटर) अंतरातील टोलिंग आणि ओअँडएम कृतींचा, महसुलाशी जोडलेल्या 30 वर्षांच्या कन्सेशन पीरियडसाठी, समावेश होतो
· हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग प्रकल्पानंतरचा देशातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा सिंगल असेट टीओटी प्रकल्प आहे, हे दोन्ही प्रकल्प आता कंपनीच्या पोर्टफोलिओचा भाग असल्यामुळे टीओटी क्षेत्रातील कंपनीचा वाटा 37% झाला आहे
· वित्तीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर, कंपनी हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाला (एचएमडीए) 7,380 कोटी रुपयांचे अपफ्रण्ट पेमेंट करणार आहे
· ह्या प्रकल्पामुळे कंपनीने तेलंगण राज्यात कार्यक्षेत्र विस्तारले आहे, कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या राज्यांची संख्या त्यामुळे 11 झाली आहे
· हा प्रकल्प प्राप्त झाल्यामुळे कंपनीची पायाभूत मालमत्ता 70,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे आणि ओअँडएम कार्यादेश पुस्तिका 14,500 कोटी रुपयांनी वाढली आहे
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. वीरेंद्र डी. म्हैसकर ह्याबाबत म्हणाले, “आमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या प्रतिष्ठेच्या प्रकल्पाचा समावेश करणे खूपच अभिमानास्पद आहे. ह्यामुळे आमची पायाभूत मालमत्ता 70,000 कोटी रुपयांवर गेली आहे आणि टीओटी क्षेत्रातील आमचा वाटा 37% झाला आहे. भारतात एखाद्या खासगी कंपनीने प्राप्त केलेला हा सर्वाधिक वाटा आहे.” ते पुढे म्हणाले, “सर्व अधिकारी व संबंधितांबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा प्रकल्प आमच्या प्रायव्हेट इन्व्हाइट (Pvt InvIT ) प्लॅटफॉर्ममार्फत कार्यान्वित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
हैदराबाद महानगर विकास प्राधिकरण अर्थात एचएमडीएने ह्या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बोली आमंत्रित केल्या होत्या; ह्या प्रक्रियेत कंपनीने सहभाग घेतला आणि त्यांनी लावलेली बोली यशस्वी ठरली.
सवलत करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर प्रकल्प एसपीव्ही 120 दिवसांच्या आत 7,380 कोटी रुपयांचे पेमेंट करणार आहे.
हैदराबाद आउटर रिंग रोड (ओआरआर) प्रकल्प:
हैदराबाद आउटर रिंग रोड (ओआरआर) हा 158 किलोमीटरचा, 8 पदरी रिंग रोड द्रुतगती मार्ग आहे. तेलंगणची राजधानी हैदराबादच्या भवताली हा वर्तुळाकृती मार्ग आहे. डिसेंबर 2012 मध्ये खुला झालेल्या ओआरआरचा मोठा म्हणजे 124 किलोमीटरचा भाग हाय-टेक सिटी, नानकरामगुडा फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयकेपी नॉलेज पार्क, हार्डवेअर पार्क, तेलंगण राज्य पोलिस अकादमी, सिंगापोर फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट आणि गेम व्हिलेज ह्या शहरातील ठिकाणांना जोडतो. ओआरआर अन्य महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांशी उत्तमरित्या जोडलेला आहे.