आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांची जोड स्तुत्य: रवींद्र धंगेकर

19
पुणे : “समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी व्हावी. वाढदिवस किंवा अन्य आनंदाच्या क्षणी सामाजिक उपक्रमांची जोड देण्याचे कार्य स्तुत्य आहे. जेधे घराण्याने आजवर समाजाची निःस्वार्थ सेवा केली असून, हाच वारसा कान्होजी जेधे पुढे नेत आहेत,” असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.
श्री शिवछत्रपती मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कान्होजी जेधे यांच्या वाढदिवसानिमित्त जेधे सोशल वेल्फेअर फाउंडेशन व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनावेळी रवींद्र धंगेकर बोलत होते. प्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल विजय भंडारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, लायन्स क्लबचे श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, संयोजक कान्होजी जेधे व ऍड. ऋचा जेधे, दयानंद जेधे, लायन्स क्लब ऑफ विजयनगरचे अध्यक्ष विपीन शेठ, लायन्स क्लब ऑफ गणेशखिंडचे महेंद्र गादिया, लायन्स क्लब ऑफ ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरीच्या अध्यक्षा माधुरी पंडित, लायन्स क्लब ऑफ प्लॅटिनमचे अमोल मेहता आदी उपस्थित होते.
शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारुती मंदिराजवळील जेधे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात आयोजित या शिबिरात डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्तदाब, हाडे, कान-नाक-घसा, मधुमेह, हिमोग्लोबिन, दातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जवळपास ८०० नागरिकांनी याचा लाभ घेतला. ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासह शेकडो नागरिकांना आधार कार्ड, आयुष्मान भारत, पॅनकार्ड काढून देण्यात आले. माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक चंदूशेठ कदम, जया किराड, गौरव बोऱ्हाडे, नाना कापरे आदींनी शिबिरावेळी उपस्थित राहून जेधे यांना शुभेच्छा दिल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बलराज वंडेकर, शरद पतंगे, विक्रांत गवळी, प्रीतम परदेशी, साईराज नाईक, साहिल भिंगे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
विजय भंडारी म्हणाले, “कोरोनामुळे आपण सर्वजण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झालो आहोत. समाजातील गरजू घटकांना नियमित आरोग्य तपासणीचा लाभ घेता यावा, यासाठी अशा शिबिरांचा उपयोग होतो. याच भावनेतून लायन्स क्लबच्या वतीने आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते.”
डॉ. रोहित टिळक म्हणाले, “जेधे घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा अशा विधायक उपक्रमांतून कान्होजी जेधे जपत आहेत. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतील. वाढदिवस साजरा करताना सामाजिक भान जपण्याचे संस्कार कान्होजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृतीतून दिसत आहेत.
कान्होजी जेधे म्हणाले, “समाजभूषण स्वर्गीय बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव उर्फ तात्यासाहेब जेधे यांच्या प्रेरणेतून समाजाच्या हिताचे उपक्रम राबवत आहोत. विधायक कार्यातून वाढदिवस साजरा करताना मिळणारा आनंद वेगळाच असतो.”
श्याम खंडेलवाल यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र गोयल यांनी आभार मानले.