पुणे, ११ ऑगस्ट २०२३: आदित्य बिर्ला कॅपिटलची कर्जपुरवठा करणारी उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड (ABFL) एमएसएमई ग्राहकांसाठी डिझाइन केलेला उद्योग प्लस हा एक अभिनव वन-स्टॉप बिझनेस प्लॅटफॉर्म सादर करत आहे. हा नवीन बी टू बी डिजिटल प्लॅटफॉर्म महाराष्ट्राच्या वाढत्या एमएसएमई क्षेत्रासाठी वित्तपुरवठा, संरक्षण, गुंतवणूक, सल्लागार आणि मूल्यवर्धित सेवांसह विस्तृत आर्थिक उपायसुविधा सादर करतो. उद्योग प्लसच्या माध्यमातून, ABFL चे उद्दिष्ट महाराष्ट्रातील एमएसएमईना पूर्णत: विनाअडथळा आणि पेपरलेस असे महत्त्वपूर्ण आर्थिक साहाय्य देऊन आर्थिक समावेशन आणि कर्ज देण्याच्या परिक्षेत्रात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देऊन सक्षम करत त्यांची वाढ आणि विकास सुलभ करणे हे आहे.
उद्योग प्लस ही एक खुली बाजारपेठ असून ती आदित्य बिर्ला कॅपिटल वेबसाइटच्या website फायनान्सिंग सेक्शनद्वारे ABFL च्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांना मिळू शकते. महाराष्ट्रातील एमएसएमई आता उद्योग प्लसच्या पूर्णपणे पेपरलेस डिजिटल प्रवासाद्वारे १० लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज घेऊ शकतात. काही सुरक्षा ठेव न लागणाऱ्या व्यवसाय कर्जाव्यतिरिक्त, प्रवर्तक, मालक आणि कर्मचार्यांसह एमएसएमईची संपूर्ण परिसंस्था सानुकूलित सुरक्षित कर्ज, विमा, गुंतवणूक उपाय इ. उद्योग प्लस द्वारे सादर केलेल्या विविध सेवांचा आनंद घेऊ शकते.
या प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांना क्रेडिट सुविधा देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म ओपन क्रेडिट एनेबलमेंट नेटवर्क (OCEN) आणि खाजगी ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे सरकारी ई-कॉमर्स वेबसाइट्ससह एकत्रित केले आहेत. आदित्य बिर्ला फायनान्सने एमएसएमई ग्राहकांना अनेक मूल्यवर्धित सेवा सादर करण्यासाठी आघाडीच्या सुविधा पुरवठादारांसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये कॉर्पोरेट ट्रॅव्हल सोल्यूशन्स, झिरो बॅलन्स बँक खाते, अकाउंटिंग, पेरोल यांचा समावेश असलेले व्यवसाय नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणि डिजिटल कॉमर्समध्ये विनामूल्य प्रवेश आणि कर भरण्याची साधने आणि विशेष ज्ञान आशय हब या गोष्टी अंतर्भूत आहेत.
ABFL चे एमएसएमई विभागामध्ये आधीपासूनच मजबूत स्थान असून त्यामध्ये व्यवसाय कर्जाचा समावेश असलेल्या एकूण कर्ज पुस्तकापैकी सुमारे ५०% आहे. बाजारपेठेतील एक प्रस्थापित कंपनी म्हणून, ABFL ने या विभागात वर्ष-दर-वर्ष ३७% वाढ मिळवून जोरदार विकास केला आहे. उद्योग प्लस सादर करून, ABFL चे उद्दिष्ट एमएसएमई साठी व्यवसाय कर्ज प्रवासाचे डिजिटायझेशन करून क्रेडिट लँडस्केप सुलभ करणे आहे. त्यामुळे त्वरित कर्ज वाटप होईल.
आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश सिंग म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रातील आमच्या एमएसएमई ग्राहकांसाठी उद्योग प्लस सादर करण्यास उत्सुक आहोत. यामुळे यशाची नवीन क्षितिजे गाठण्यासाठी ते सक्षम होतील. महाराष्ट्रात आता ४७ लाखांहून अधिक एमएसएमई ग्राहक आहेत. त्यांच्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, एमएसएमई विभागामध्ये ABFL चे पाऊल आणखी मजबूत करणे आणि त्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवन चक्रात विस्तृत सुविधा पुरविणे आणि महाराष्ट्राच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे.”
एमएसएमई क्षेत्राने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १०% चा आर्थिक विकास साधून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोलाची भूमिका बजावली असून नऊ दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. या विकासात योगदान देत नोंदणीकृत एमएसएमईच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वात मोठे राज्य आहे आणि राज्यातील ४५% पेक्षा जास्त एमएसएमई मुंबई आणि पुण्यात आहेत.उद्योग प्लसच्या माध्यमातून ABFL चे उद्दिष्ट महाराष्ट्रातील एमएसएमई ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे आणि बाजारपेठेतील मूल्य प्रस्ताव अधिक मजबूत करत त्यांना यशस्वी, विजयी अनुभव मिळवून देणे हे आहे.