मनोरंजन उद्योगात, दिग्गज कलाकारांमध्ये भाग्य प्राप्ती साठी काही समज, श्रद्धा मनात बाळगणे हे खूपच सामान्य आहे. विशिष्ट रत्न परिधान करण्यापासून ते स्वतःची नावे बदलण्यापर्यंत अनेक समजुती त्यांच्यात मोठ्या प्रमाणात असतात. ‘’खतरों के खिलाडी 13’ या बहुप्रतीक्षित शो मध्ये आपल्या रोमांचकारी मोहिमेने प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज असलेली, आकर्षक सुन्दूस मौफकीर ही सुद्धा अशा व्यक्तींच्या श्रेणीत सामील होणारी आहे. पण सुन्दूसच्या लहानपणापासून तिच्यासोबत असलेल्या रोझा या लाडक्या बाहुली बरोबरच्या तिच्या विलक्षण संबंधामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते.
रोझा तिच्या आयुष्यात पुढे घडणार्या भाग्यवान घटनांची ग्वाही देते अशी सुन्दूसच्या मनात खोलवर रुजलेली समजूत असल्याचे ती सांगते, ज्यामुळे तिला एम. टिव्ही वरील स्प्लिट्सव्हिला 14 मधील उल्लेखनीय विजयासारखे विजय मिळवता आले. ‘खतरों के खिलाडी 13’ मधील चित्तथरारक आव्हाने जसजशी उलगडत जात आहेत, तसे रोझा पुन्हा एकदा आपली जादू दाखवणार का आणि सुन्दूसला द अल्टिमेट खिलाडी हा किताब मिळवण्यास मदत करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोझाविषयीचे आपले प्रेम व्यक्त करताना सुन्दूस मौफकीर सांगते, “मी तशी काही अंधश्रद्धाळू नाही, पण रोझा या माझ्या भाग्यवान बाहुलीशी असलेले माझे खास नाते मी नाकारू शकत नाही. ज्या दिवसापासून एक भेटवस्तू म्हणून ती माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून ती कायम माझी सोबती आहे. तिच्याविना मी कधीही नवीन काम सुरू करत नाही. हे अविश्वसनीय आहे, पण रोझा वेळोवेळी मला चांगले भाग्य मिळवून देते. जेव्हा एम.
टिव्ही वरील स्प्लिट्सव्हिला 14 मध्ये मी विजयी झाले तेव्हा ती माझ्यासोबत होती आणि आता ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये देखील तिची मोहिनी काम करेल अशी मला आशा आहे. यश मिळवण्यासाठी कष्ट आणि समर्पण यांची आवश्यकता असते, पण नशिबाचा थोडासा शिडकावा सुद्धा त्यात असेल, तर उत्तमच ना! दक्षिण अफ्रिकेत माझी वाट पाहत असलेल्या साहसांना तोंड देण्यासाठी मी उत्सुक आहे आणि माझ्या सोबतीस रोझाला घेऊन माझ्या भीतीवर मात करण्यास मी सज्ज आहे.”
‘खतरों के खिलाडी 13′ लवकरच येत आहे, फक्त कलर्सवर!