…आणि बिग बॉस मराठी सिझन चौथाचा महाविजेता आहे ? ग्रँड फिनाले ८ जानेवारी संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर !

168

पुणे, २ जानेवारी २०२२ : बिग बॉस मराठी म्हंटलं कि आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार ? सदस्य कोण असणार ? सिझनच घर कसं असेल ? आणि बरंच काही… आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला… १०० दिवसांपूर्वी १६ सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहे टॉप ६ सदस्य.

यामध्ये महाराष्ट्राला मोठं सरप्राईझ मिळालं  कारण, ज्या स्पर्धकाची वाट आपण सगळे बघत होतो त्या स्पर्धकाची एंट्री झाली आणि घरात त्या सदस्याने धुमाकूळ घातला. ती सदस्य म्हणजे राखी सावंत. सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले… कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला हि गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अश्या अनेक क्षणांचे साक्षिदार राहिले आहे.

आता हेच घर निरोप घेण्याच्या वाटेवर आहे. कारण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही. बिग बॉस मराठी सिझन ४ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या टॉप ६ मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन ४ चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन चौथाचा ग्रँड फिनाले ८ जानेवारी रोजी संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घराला यावर्षी कधी अपूर्वाच्या आवाजाने तर कधी अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं. कधी अक्षयची स्ट्रॅटेजि तर कधी राखीचे राडे आणि फुल ऑन एंटरटेनमेंट ने हे घर सतत चर्चेत राहिले. कधी हे घर विकास आणि अपूर्वाच्या लुटुपुटुच्या भांडणांचे साक्षिदार राहिले तर कधी घरात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे. कधी सदस्यांसोबत हे घर खूप हसलं तर कधी त्याला देखील अश्रू अनावर झाले. या घराने सदस्याचे प्रत्येक रूप पहिले. मायाळू, खोडकर, भांडखोर, संवदेनशील, कारस्थानी… या भिंती आणि या घरातील प्रत्येक वस्तू याचे साक्षिदार असतील.

आता एकदा शेवटचं या सदस्यांसोबत गप्पा मारूया आणि त्यांच्या या महत्वाच्या क्षणात त्यांच्याबरोबर राहूया. बिग बॉस मराठीच्या या पर्वाच्या प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम काही सदस्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा प्रवास संपला असून लवकरच भेटूया पुन्हाएकदा नवे घर आणि नव्या सदस्यांसोबत ! तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन चौथाचा  ग्रँड फिनाले   ८ जानेवारी रोजी संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.