आजच्या युवा पिढीने स्मार्टवर्क वर भर दिला पाहिजे : आमदार  सत्यजित तांबे पाटील

33

पुणे : आजच्या युवा पिढीने स्मार्टवर्क वर भर दिला पाहिजे असे आमदार सत्यजित तांबे पाटील म्हणाले. फिजिक्स या विषयात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी)च्यावतीने रोप्य महोत्सवी वर्षारंभानिमित्त वतीने कौतुकाची थाप टाकण्यात आली. ज्या मुलांनी चांगले यश संपादन केले आहे,अशा विद्यार्थ्यांचा सन्माचिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले.

तसेच सन्मानित विद्यार्थ्यांच्या पालकांनाचाही फेटा बांधून सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा कोथरूड, पुणे येथे  डीआरडीओचे माजी संचालक डॉक्टर एम आर पाटकर, युथ आयकॉन आमदार श्री. सत्यजित तांबे पाटील, प्रोफेसर प्रमोद जाधव, प्रोफेसर एन.एम कुलकर्णी, नवनाथ जाधव, मा. अ‍ॅड. वासंती जाधव, आदींच्या उपस्थित पार पडला.

पुरस्कार वितरण प्रसंगी आपल्या मार्गदर्शनात आमदार श्री. सत्यजित तांबे पाटील म्हणाले की, आजच्या युवापिढीने कष्टासोबत स्मार्ट वर्क ही केले पाहिजे. अधिकतर आपण एकाच मार्गाने यशा कडे धावत असतो, परंतू थोड स्मार्टवर्क आणि रस्ता बदलून यशाचा शिखर गाठता येतो त्यामुळे स्मार्ट पध्दत वापरावी.

तुलनेत जरासा अवघड, समजायला किचकट फिजिक्स विषय शिकवणं नक्कीच आव्हानात्मक काम आहे. परंतु प्रमोद जाधव यांनी आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेललं आहे. या इन्स्टिट्यूटमुळे फिजिक्ससारख्या किचकट विषयात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण झाली असून सीईटी,एनईईटी, जेईई सारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगले यश मिळवत आहेत.

डीआरडीओचे माजी संचालक डॉक्टर एम आर पाटकर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांवर आपल्या इच्छा न थोपता मुलांना ज्या क्षेत्रात जायचे आहे जावू द्या, ज्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडल्यास यश नक्की येते. आजच्या मुलांची विचार करण्याची क्षमता वाढली आहे, ज्या क्षेत्रात त्यांची आवड, इच्छा आहे, त्याच क्षेत्रात त्यांनी आपले करिअर घडवावे. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स  संस्था अशी आहे  जी पैसे कमावण्यासाठी काम न करता मुलांच्या शिक्षणाशी झटत आहे, त्यामुळे आज या संस्थेस पसंती मिळत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे प्रोफेसर प्रमोद जाधव म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात. या 24 तासाचा कोण कसा उपयोग करतो त्यानुसार त्यास फळ मिळत असते, आज या गुणंवत विद्यार्थ्यांनी आपल्या 24 तासाचा योग्य वापर केल्यामुळ आपल्या आईवडिलाची मान उंचावली आहे. त्यामुळे वेळेला महत्व द्या एकदा वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही. वेळेचा सदउपयोग केला तर यश मिळतेच.

याप्रसंगी प्रोफेसर एन. एम. कुलकर्णी यांनी पालकांना संबोधित करताना म्हणाले की, पाल्याच्या अभ्यासाची जबाबदारी पालकांची ही आहे त्यांना घरातून अभ्यासास पोषक वातावरण देणे ही सर्वस्वी त्यांचीच जबाबदारी आहे.