संगमेश्वर (विलास गुरव) : येथील आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीत ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आंबव गावचे सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर, गावप्रमुख मोहन भुवड, सुनील घडशी, संजय भुवड, रिया मयंक, निधी भायजे, ग्रामपंचायत सदस्य दिपाली कुडतरकर, माजी सरपंच प्रिया सुवरे, ग्रामसेवक दडस भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून जिलबी वाटण्यात आली.
आंबव पोंक्षे ग्रामपंचायत येथे सरपंच शेखर उकार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गावातली शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी आपला शेतातील उत्पन्न वाढवण्यावर भर राहील, गावातली मुलांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीचे राहील, असे सांगितले.
हेही वाचा
TODAY DAILY HOROSCOPE: ‘या’ राशीच्या लोकांना दांपत्य जीवनात सुख – समाधान लाभेल; वाचा संपूर्ण राशीफळ