राष्ट्रीय, ऑगस्ट २०२३ : अॅक्सिस बँक या देशाच्या खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एका बँकेने आज आपल्या सीबीडीसी अॅपवर (अॅक्सिस मोबाइल डिजिटल रूपी) युपीआय इंटरऑपरेबिलिटी देत असल्याचे जाहीर केले. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या सीबीडीसी (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) उपक्रमाचा भाग आहे.
या सुविधेच्या मदतीने ग्राहकांना व्यापारी वर्गाच्या युपीआय क्यूआरकोडवर सहजपणे डिजिटल रूपी वापरता येणार आहे. त्याशिवाय या सुविधेमुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या सद्य क्यूआर कोड्सवर डिजिटल रूपी पेमेंट्स स्वीकारता येईल व त्यामध्ये समाविष्ट होण्याचे बंधन राहाणार नाही.
या घोषणेविषयी अॅक्सिस बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक राजीव आनंद म्हणाले, ‘तंत्रज्ञानावर आधारित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम लाँच करण्यात आघाडीवर असलेली अॅक्सिस बँक डिजिटल भारताच्या धोरणाला चालना देण्यासाठी बांधील आहे. डिजिटल रूपी आणि युपीआय इंटरऑपरेटिबिलीटी या क्रांतीकारी सुविधा लाँच करत बँक देशभरात डिजिटल रूपीची स्वीकार्हता वाढवण्यात मोठे योगदान देईल. डिजिटल रूपीची सुरक्षितता आणि वेग व त्याला मिळालेली युपीआयच्या व्याप्ती व सोपेपणाची जोड यांमुळे ग्राहक तसेच व्यापारी वर्गाचा लाभ होईल.’
‘अॅक्सिस मोबाइल डिजिटल रूपी’ अॅपवरील युपीआय इंटरऑपरेबिलिटी टप्प्याटप्प्याने ग्राहकांसाठी उपलब्ध केली जात असून सध्या ती अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. त्यानंतर ती सर्व डिजिटल रूपी युजर्ससाठी उपलब्ध केली जाईल. २६ प्रायोगिक शहरांत ही सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) डिजिटल रूपी हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा उपक्रम आहे. डिजिटल रूपी ही सेंट्रल बँकेने डिजिटल स्वरूपात लाँच केलेली कायदेशीर निविदा आहे. डिजिटल रूपीमध्ये (e₹) प्रत्यक्ष रोख पैशांचे फायदे उदा. विश्वास, सुरक्षा, निश्चितता आणि तत्परता यांचा डिजिटल रूपात समावेश होतो.
’अॅक्सिस डिजिटल रूपी’ अॅप आयओएस आणि अँड्रॉइड उपकरणावर वापरता येईल. या अॅपमुळे युजर्सना अॅक्सिस बँक बचत खात्याशी जोडलेले डिजिटल वॉलेट्स लोड करता येईल. युजर्सना यात समाविष्ट झालेल्या इतर युजर्सकडून डिजिटल रूपी सहजपणे मिळवता/पाठवता येईल. त्यांना कोणत्याही डिजिटल रूपीचा वापर करून सीबीडीसी किंवा युपीआयवर असलेल्या मर्चंट क्यूआरवर पैसे भरता येतील.