अलुकोबॉण्डच्या कलर्स आणि सरफेसेसच्या नावीन्यपूर्ण श्रेणी बाजारात दाखल

27
Ranjeet-Sharma

पुणे, ऑगस्ट २०२३ : ३ए कॉम्पोझिट्स ह्या जागतिक स्तरावरील आधुनिक व उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम संयुग साहित्याच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या स्विस कंपनीच्या अलुकोबॉण्ड ह्या फ्लॅगशिप ब्रॅण्डने रंग व पृष्ठभागांची (सरफेसेस) अनन्यसाधारण व अभिजात श्रेणी बाजारात आणून आपला अव्वल दर्जाचा पोर्टफोलिओ अधिक समृद्ध केला आहे. कलरस्केप्स, काँक्रिट आणि ग्रोव्ह अशी तीन नवीन उत्पादने ब्रॅण्डने बाजारात आणली आहेत.

ह्या तीन मालिकांशिवाय अलुकोबॉण्डने चाळीसहून अधिक रंगांच्या पर्यायांसह एक आकर्षक पोर्टफोलिओ प्रस्तुत केला आहे. या तीन मालिकांच्या माध्यमातून दीर्घकालीन स्थापत्य वापरासाठी सर्वोत्तम सरफेस कोटिंग आणि रंग बाजारात आणून अलुकोबॉण्डने आर्किटेक्ट्सना त्यांच्या रचनांना वैशिष्ट्यपूर्ण चेहरा देण्याच्या कामात मोलाची मदत केली आहे. हा नवीन पोर्टफोलिओ, भारताच्या विविध भागांत निर्माणाधीन स्थितीत असलेल्या, अव्वल दर्जाच्या व्यावसायिक व निवासी इमारती, विमानतळ, व्यापारी संकुले आणि संस्थांसाठी खास विकसित करण्यात आला आहे. सध्या कंपनीने आपल्या समर्पित व सुस्थापित विक्री जाळ्याच्या (नेटवर्क) माध्यमातून भारतातील मोठ्या बाजारपेठांमधील आर्किटेक्ट्स, विकासक आणि फॅब्रिकेटर्सना लक्ष्यस्थानी ठेवले आहे. ३ए कॉम्पोझिट्स ही कंपनी पुण्याजवळील अत्याधुनिक कारखान्यात एसीपी साहित्याचे उत्पादन करत आहे. हा कारखाना २००७ मध्ये स्थापन करण्यात आला आहे आणि पंतप्रधानांच्या ‘मेक ऑफ इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत पद्धतीने काम करत आहे.

३ए कॉम्पोझिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व सीईओ श्री. रणजीत शर्मा ह्या नवीन श्रेणीबद्दल म्हणाले, एसीपी स्थापित करण्यासाठी आर्किटेक्ट्स नेहमीच अलुकोबॉण्ड ह्या आमच्या फ्लॅगशिप ब्रॅण्डला पसंती देतात. आर्किटेक्ट्सना आधुनिक व शैलीदार इमारतींमध्ये सुरक्षित अग्निशामक साहित्य वापरताना आपल्या सर्जनशीलतेला पूर्ण न्याय देता यावा, ह्या दृष्टीने आम्ही पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पोर्टफोलिओमध्ये तीन नवीन कलर सीरिज आणल्या आहेत. धातूसदृश (मेटॅलिक), मूलभूत (सॉलिड) आणि चैतन्यपूर्ण (व्हायब्रण्ट) रंगछटांचा योग्य समतोल साधल्यास स्थापत्याची काही अंगे अधिक खुलवली जाऊ शकतात. त्यामुळे आर्किटेक्ट्सना रचनेतील महत्त्वाचे घटक प्रकाशात आणण्यासाठी आवश्यक ती लवचिकता मिळते.”

मेटॅलिक, सॉलिड कलर्स आणि सरफेसेसचा समावेश असलेल्या कलरस्केप्स श्रेणीच्या मदतीने आर्किटेक्ट्स त्यांच्या शैलीतील रचना निर्माण करण्यासाठी विविध रंगछटांचा वापर करू शकतील. अॅल्युमिनिअम संयुगातील साहित्य वापरून त्याला काँक्रिटसारखा लूक देण्यासाठी अलुकोबॉण्डने काँक्रिट रंगछटांची मालिका आणली आहे. ही उत्पादने फसाड क्लॅडिंग अर्थात दर्शनी भागावरील आवरणासाठी उत्तमरित्या वापरली जाऊ शकतात. लाकडाचा भास निर्माण करण्यासाठी अलुकोबॉण्डने ग्रोव्ह नावाची अनन्यसाधारण श्रेणी आणली आहे. त्यामुळे रचनाकाराला नैसर्गिक लाकडाऐवजी अॅल्युमिनिअम कॉम्पोझिट साहित्य वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते. हे दिसायला लाकडासारखे दिसते पण लाकडाप्रमाणे कुजण्याचा किंवा त्यावर बुरशी येण्याचा धोका ह्या साहित्याबाबत नसतो.