अमेझॉन इंडियातर्फे प्रतिधी शिष्यवृत्तीच्या लाभार्थींचा गौरव, डिलिव्हरी सहयोगींच्या मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी विकसित केलेला कार्यक्रम

81
Amazon India felicitates beneficiaries of its Pratidhi Scholarship, designed to support education of the children of Delivery Associates

अमेझॉन इंडियाने आपल्या प्रतिधी शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या लाभार्थींचा गौरव केला आहे. आपल्या डिलिव्हरी सहयोगींच्या मुलांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेत मदत करण्यासाठी अमेझॉन इंडियाने हा कार्यक्रम आखला आहे. २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती, डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर व अमेझॉन फ्लेक्स कार्यक्रमाखाली येणाऱ्या भारतातील सर्व डिलिव्हरी सहयोगींसाठी खुली आहे. कर्नाटक सरकारमधील विकलांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण संचालयाच्या संचालक श्रीमती के. एस. लताकुमारी (आयएएस) आणि अमेझॉन इंडियाच्या ऑपरेशन्स विभागाचे एचआर संचालक लिजू थॉमस  यांच्या उपस्थितीत, बेंगळुरू येथे आयोजित एका सोहळ्यात, यांतील काही लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.  

डिलिव्हरी सहयोगींची २-१२ इयत्तांमधील शेकडो मुले ह्या शिष्यवृत्तीचा उपयोग त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी, कोचिंग क्लासच्या अतिरिक्त फीसाठी, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी, ग्रंथालयाच्या सदस्यत्वासाठी, बस किंवा ट्रेनच्या पाससाठी तसेच शिक्षणाशी निगडित अन्य खर्चांसाठी करतात. या कार्यक्रमाखाली, प्रत्येक मुलाला शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही शिष्यवृत्ती त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित असते. शिष्यवृतीचे वार्षिक तत्त्वावर नूतनीकरण केले जाते.  ही शिष्यवृत्ती उपलब्ध करून घेण्यासाठी डिलिव्हरी सहयोगींनी त्यांची नामांकने पाठवली. एफएफईद्वारे (फाउंडेशन फॉर एक्सलन्स) (Foundation for Excellence) स्वायत्तपणे पूर्वनिश्चित निकषांवर त्यातील नामांकने निवडण्यात आली. या निकषांमध्ये मुलाची शैक्षणिक कामगिरी व पालकांची आर्थिक स्थिती यांच्यासह इतरही अनेक घटकांचा समावेश होता. 

डिलिव्हरी सहयोगींच्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याप्रती अमेझॉन इंडिया मानत असलेल्या बांधिलकीचा प्रतिधी शिष्यवृत्ती हा एक भाग आहे. 

अमेझॉन इंडियाच्या ऑपरेशन्स विभागाचे एचआर संचालक श्री. लिजू थॉमस या उपक्रमाबद्दल म्हणाले, “आमच्या ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव मिळावा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डिलिव्हरी सहयोगींना मदत करण्याचे अनेक मार्ग आम्ही सातत्याने शोधत असतो. प्रतिधी शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून, आमच्या डिलिव्हरी सहयोगींच्या मुलांना त्यांची शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यात व त्यांच्या महत्त्वाकांक्षा स्पष्ट दृष्टीने पूर्ण करण्यात मदत करण्याचे, उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. आमच्या डिलिव्हरी सहयोगींच्या कुटुंबांचे भवितव्य उज्ज्वल व मजबूत करण्याप्रती आम्ही बांधील आहोत.”

अमेझॉनच्या डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनरमधील  डिलिव्हरी सहयोगी अनिता मनिवेळू म्हणाल्या,  “माझ्या मुलाला शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून अमेझॉन शिष्यवृत्ती पुरवत आहे, याचा मला आनंद वाटतो. या शिष्यवृत्तीमुळे केवळ माझ्या मुलाच्या शिक्षणातच मदत होत नाही, तर त्याला चांगला अभ्यास करण्यास व भवितव्य घडवण्यास प्रेरणाही मिळत आहे.”

‘सक्सेस अँड स्केल ब्रिंग ब्रॉड रिस्पॉन्सिबिलिटी’ (यश व व्याप्तीसह विस्तृत जबाबदारीही येते) या नेतृत्व तत्त्वाशी सुसंगती राखत, अमेझॉनने संपूर्ण समुदायातील सहयोगींच्या कल्याणावर सकारात्मक प्रभाव करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २०१४ मध्ये अमेझॉनने मुंबई व दिल्ली राजधानी परिसरातील (एनसीआर) फुलफिलमेंट केंद्रांच्या क्षेत्रात एक समुदाय संवाद कार्यक्रम  सुरू केला. त्यानंतर हळूहळू हा कार्यक्रम अमेझॉनच्या ३०० ठिकाणांवरील फुलफिलमेंट व सॉर्टेशन केंद्रे, डिलिव्हरी स्टेशन्स व यूएफएफमध्ये विस्तारण्यात आला. आपल्या गुड नेबर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, अमेझॉनने शिक्षण, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता, स्त्री सबलीकरण, कौशल्य व उद्योजकता, पर्यावरण, रस्ते सुरक्षितता व आपत्ती प्रतिसाद या सात प्रमुख क्षेत्रांशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले आहे. 

हेही वाचा :

महिंद्रा रिसर्च व्हॅली ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानात आघाडीवर, गेल्या ६ तिमाहींमध्ये २१० पेटंट्स नोंदवत आघाडीच्या स्थानावर शिक्कामोर्तब