पुणे, १६ नोव्हेंबर २०२२ : अमेझॉनचा डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर (डीएसपी) कार्यक्रम रचना खेर यांच्यासारख्या व्यक्तींना उद्योजकतेची कास धरण्याची आणि स्वत:चा लॉजिस्टिक्स व्यवसाय उभा करण्याची क्षमता देतो
अमेझॉन आपल्या डिलिव्हरी नेटवर्कची व्याप्ती व विस्तार संपूर्ण पुण्यात करत असतानाच, व्यक्तींनाही आपल्या उद्योजकतेच्या क्षमता उपयोगात आणण्यास सक्षम करत आहे तसेच आपल्या ‘डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर’ (डीएसपी) कार्यक्रमामार्फत त्यांच्या कक्षा रुंदावण्याच्या संधी त्यांना देत आहे. हा कार्यक्रम उद्योजकांना त्यांचा स्वत:चा दुर्गम भागापर्यंत डिलिव्हरी देणारा व्यवसाय शून्यातून उभारण्यास सक्षम करतो. यासाठी त्यांना सहाय्यकारी संरचना, तंत्रज्ञान व अनेक आवश्यक सेवा अमेझॉनतर्फे पुरवल्या जातात. यामुळे अनेक उद्योजकांना वाढीची संभाव्यता असलेले छोटे व्यवसाय उभे करणे व अमेझॉनच्या देशभरातील ग्राहकांना वस्तू घरपोच देणे शक्य झाले आहे. सध्या ३०० हून अधिक उद्योजक, ९०० हून अधिक शहरे व गावांमधील सुमारे १८०० पार्टनर डिलिव्हरी स्टेशन्सचे व्यवस्थापन करत आहेत.
स्वत:साठी वैविध्यपूर्ण कामाच्या संधी निर्माण करणाऱ्या उद्योजकांचे एक उदाहरण म्हणजे पुणेस्थित उद्योजक तसेच अमेझॉन डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर रचना खेर आहे . रचना यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पहिल्यापासून होते आणि त्यांनी २००९ साली स्वत:चा व्यवसायही सुरू केला होता. मात्र, त्यांनी १० वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट क्षेत्राचे धक्केही खाल्ले होते. त्यांच्या ९ ते ५ अशा नियमित वेळाच्या नोकरीत त्या समाधानी नव्हत्या. ही नोकरी सोडल्यानंतर त्यांनी प्रिया जुनागडे या आपल्या मैत्रिणीसोबत काम सुरू केले. प्रिया यांनाही उद्योजक होण्याची उत्कट इच्छा होती. त्या दोघींनी मिळून संधींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना अमेझॉनच्या डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर कार्यक्रमाविषयी कळले. त्यांनी या कार्यक्रमाकडे एक संधी म्हणून बघितले. यातून केवळ त्यांचे स्वप्न साकार होणार नव्हते, तर एरवी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या एका उद्योगक्षेत्रात त्यांना उद्योजकतेच्या वेगळ्या वाटेवर चालण्याचीही संधी मिळणार होती. रचना यांनी मैत्रिणीच्या साथीने त्वरित ही संधी घेण्याचे ठरवले आणि जून २०१९ मध्ये अमेझॉन डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर म्हणून निर्भया कॅब्ज हा व्यवसाय सुरू केला.
“कॉर्पोरेट क्षेत्र ते अमेझॉनची डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर म्हणून एक यशस्वी उद्योजक हा प्रवास खूपच समृद्ध करणारा आहे. २०१९ मध्ये माझी व्यवसाय भागीदार प्रिया जुनागडे हिच्यासह या प्रवासासाठी निघणे सोपे नव्हते, पण आम्ही मोठी स्वप्ने बघण्याचा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा निर्धार केला होता. या कार्यक्रमाचा भाग म्हणून अमेझॉनने आम्हाला भक्कम व्यवसायाचा पाया उभारण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, प्रशिक्षण व कौशल्यांचे शिक्षण पुरवले. एक मॉमप्रेन्युर म्हणून माझा अनुभव स्वत:चा व्यवसाय प्रस्थापित करण्याची इच्छा असलेल्या अनेकांना प्रेरणा देईल, अशी आशा वाटते,” असे रचना सांगतात.
सध्या रचना पुण्यात आपल्या लॉजिस्टिक्स व्यवसायाच्या माध्यमातून चार डिलिव्हरी स्टेशन्स चालवतात आणि अनेक महिला डिलिव्हरी असोसिएट्सनाही कामाची संधी पुरवतात. हे यश रचना यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, कारण त्यांना लॉजिस्टिक्स विभागात यापूर्वी काहीच अनुभव नव्हता. त्यांना पुढील काही वर्षांत आपला व्यवसाय महाराष्ट्रभर विस्तारायचा आहे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव निर्माण करायचा आहे. तरुणांना लॉजिस्टिक्स क्षेत्रात करिअर उभे करण्याची संधीही आपल्या व्यवसायामार्फत मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.
अमेझॉन लॉजिस्टिक्स इंडियाचे डायरेक्टर श्री. करुणा शंकर पांडे सांगतात, “रचना आणि अन्य छोट्या व मध्यम आकारमानाच्या व्यवसाय मालकांची विस्तृत वाढ होताना बघणे तसेच त्यांना अमेझॉनच्या डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर कार्यक्रमाचा लाभ होताना बघणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. हे नवीन उद्योजक केवळ त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासाचा भक्कम पाया बांधत नाहीत, तर शेकडो-हजारो असोसिएट्ससाठी रोजगाराच्या अतिरिक्त संधी निर्माण करतात. डीएसपी कार्यक्रम भारतात प्रथम सुरू झाल्यापासून, अमेझॉनला एसएमबींना वाढीचे रस्ते खुले करून देण्यात तर या कार्यक्रमाने मदत केलीच आहे, पण त्याशिवाय देशाच्या अगदी दुर्गम भागापर्यंत पोहोचणेही या कार्यक्रमामुळे शक्य झाले आहे.”
२०२१ मध्ये अमेझॉनने डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर (डीएसपी) कार्यक्रमाचा पुढील टप्पा भारतात सुरू केला. याद्वारे डिलिव्हरीचा अल्प अनुभव असलेल्या किंवा अजिबात अनुभव नसलेल्याही महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांचा स्वत:चा डिलिव्हरी व्यवसाय सुरू करण्याची व विकसित करण्याची संधी मिळत आहे