पुणे, प्रतिनिधी ( विलास गुरव ) : वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड, या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन, गुरूवार, दि. २९/१२/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधत वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” अशी ठरविण्यात आली होती.
आमच्या नेहमीच उपक्रमशील असलेल्या शाळेत बालवाडी विभाग ते माध्यमिक विभागापर्यंत सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक यांचा स्नेहसंमेलनात अतिशय उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
सुर निरागस हो ….या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली संगीत परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि संगीत शिक्षिका विणा आखवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर असे गीत सादर केले. तसेच संगीत शिक्षिका सिध्दी ताटके यांनीही स्वागतगीत छान बसवले.
शालेय समिती अध्यक्षा रजनीताई दाते, मुख्याध्यापिका अनिता दारवटकर,शितल देशमुख वृषाली वाशिमकर,प्रभारी मुख्याध्यापिका नीता जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी ,बाल शिवाजी पाळणा ते जय भवानी जय शिवाजी,असे म्हणत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर सुंदर नृत्यप्रकार सादर केले.यामध्ये रिबन डान्स,पाॅम पाॅम असे नयनरम्य नृत्यप्रकार सादर करण्यात आले.
झिरो बन गया हिरो या नाटकाचा कार्यक्रमात विशेष उल्लेख करावा लागेल. या नाटकामध्ये गणितातील शून्याचे महत्त्व अत्यंत सुरेख पद्धतीने सादर केले .उच्च प्राथमिक विभाग तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचेही कार्यक्रम अतिशय सुंदर होते .लाठीकाठी ,दांडपट्टा, तसेच इतर गोष्टींचा वापर करून अतिशय रोमांचकारी असे नृत्यप्रकार सादर करण्यात आले.
मागील दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच स्नेहसंमेलन आयोजित केल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गातील सर्वच मुले कार्यक्रमास सहभागी झाली होती.
कार्यक्रमात अनुरूप असा पोषाख मुलांनी परिधान केला होता. प्रत्येक वर्ग शिक्षकांनी कार्यक्रम बसवण्यात मोलाची कामगिरी केली. ए वतन वतन तेरे …या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य पूर्वप्राथमिक ते उच्च प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी सादर केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक ,सामाजिक,सांस्कृतिक ,अध्यात्मिक संस्थांमध्ये सदस्य, समन्वयक, सचिव ,संपादक अशा अनेक पदांवर कार्यरत असलेले डॉ.दत्तात्रेय तापकीर यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना “कै.मातोश्री उमा खांडेकर पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री राजहंस सर सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
तसेच वनाझ शिक्षण मंडळाचे शैक्षणिक सल्लागार अ. ल. देशमुख ,शालेय समिती अध्यक्षा रजनी दाते , संस्थेचे सचिव श्री. वाय के कदम, खजिनदार विनोद सपकाळ, वनाज इंजिनियर्स युनियनचे पदाधिकारी, माननीय मुख्याध्यापिका अनिताताई, इतर शाळांतील मुख्याध्यापक, भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली. यावेळी सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या शालेय बातम्या नेहमीच तत्परतेने छापून आणणारे आपल्या शाळेतील पालक आणि हितचिंतक श्री. गुरव यांचाही या कार्यक्रमात स्वागत व सत्कार करण्यात आला .प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता जाधव पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शितल देशमुख माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.वृषाली वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रम बसवण्यात मोलाची कामगिरी केली. तसेच संपूर्ण सजावट पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक विभागाने केली होती.
कार्यक्रमाचे संपूर्ण निवेदन अश्विनी चव्हाण यांनी केले अध्यक्षीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माया झावरे यांनी केले. सूत्रसंचालन छान झाले म्हणून या दोघींचा पाहुण्यांनी विशेष सत्कार केला.
सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. कविता कांबळे, स्वाती वाघमारे यांच्या नियोजन व माननीय प्रभारी मुख्याध्यापिका नीता जाधव ,पर्यवेक्षिका सौ.माया झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचे स्नेहसंमेलन उत्तमरित्या पार पडले.