अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाकडून बलात्काराची धमकी

308

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनीही ट्विट करत मोदींचे अभिनंदन केले आहे. मात्र, सध्या दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

एका मोदी समर्थकाने तुझ्या बापाला शांत राहायला सांग, असे म्हणत अनुरागच्या मुलीला अश्लिल भाषेत धमकी दिली आहे. अनुरागने चौकीदार रामसिंघ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून आलेल्या या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या ट्विटला त्याने कॅप्शनही दिले आहे.

‘जय श्रीराम… तुझ्या बापाला त्याचं तोंड बंद ठेवायला सांग. त्यानं असं केलं नाही तर तुझ्यावर बलात्कार करेन’ अशा आशयाचं हे ट्विट आहे. यावर अनुराग कश्यपनेही ट्विट करत मोदींना प्रश्न विचारला आहे.

प्रिय नरेंद्र मोदी सर, तुम्हाला मिळालेल्या विजयासाठी अभिनंदन. सर्वसमावेशक विकासाचा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद. मात्र, सर मला हेदेखील सांगा की तुमच्या त्या समर्थकांना कसं सामोरे जायचं, जे तुमच्या विजयाचा आनंद माझ्या मुलीला अशा प्रकारचे अश्लिल मेसेज करून धमकी देत साजरा करत आहे. केवळ यामुळे मी तुमचा विरोधक आहे, असे ट्विट अनुरागने केले आहे.