अजीम प्रेमजी विद्यापीठ पदवीपूर्व कार्यक्रम २०२३ च्या प्रवेशाची घोषणा

103
Azim Premji University Undergraduate Program Admission 2023 Announcement

पुणे९ मार्च २०२३ : अजीम प्रेमजी विद्यापीठबेंगळुरूने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने रचना आणि संरचित केलेल्या नवीन – पदवीपूर्व कार्यक्रमासाठी प्रवेश जाहीर केले आहेत.या कार्यक्रमांचे उद्दिष्ट उच्च प्रेरक, सामाजिकदृष्टया जागरूक वचिंतनशील तरुण नागरिकांना तयार करणे आणि त्यांचे पालन-पोषण व स्वशिक्षण घेण्यास तयार करणे  आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीसाठी आहे. विद्यार्थी विद्यापीठाच्या वेबसाइटवर www.azimpremjiuniversity.edu.in/ug वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२३ असुन अर्जदारांची निवड लेखी चाचणीच्या आधारे केली जाईलत्यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मुलाखती घेतल्या जातील.

Azim Premji University Undergraduate Program Admission 2023 Announcement

पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये चार एकात्मिक घटकांचा समावेश आहे –एक प्रबळ प्रमुख विषय,व्यावसायिक तयारीवर केंद्रित असलेला गहन इंटर्नशिप आधारित एक आंतरशाखीय घटक,समाजामध्येप्रभावीपणे सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी रचना केलेला मूलभूत अभ्यासक्रमांचा संच आणि अभिरुचिंचेविस्तृत अन्वेषण करण्यास प्रोत्साहन देणारा लवचिक क्रेटिटनिर्देशाची संपूर्ण मालिकाचा ह्यात समावेश आहे.

अजीम प्रेमजी विद्यापीठ, भोपाळचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि शैक्षणिक वर्ष जुलै २०२३ पासून हे विद्यापीठ कार्यान्वित होणार आहे. ह्या विद्यापीठात पण अशाच प्रकारचे पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

आर्थिक मदत

अजीम प्रेमजी विद्यापीठ विद्यार्थांसाठी सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण संस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.तसेच हे विद्यापीठ गरजू विद्यार्थ्यांना व्यापक आवश्यकता आधारित तत्वावर शिकवणी शुल्क,निवास खर्च आणि भोजन खर्च समाविष्ट करुन पूर्ण किंवा आंशिक शिष्यवृत्ति प्रदान करते.